"वडवली" (ता. श्रीवर्धन, जि. रायगड.) गावात "श्री विश्वकर्मा मंदीरा"ची स्थापना बर्याच वर्षांपूर्वीच झाली होती. तेव्हा "श्री विश्वकर्मा जयंती" श्री विश्वकर्माजींच्या प्रतिमेची पुजा करून केली जायची. पण मंदीराचा जिर्णोद्धार झाल्यानंतर दि. १८ फेब्रुवारी १९९७, मंगळवार या दिवशी मंदीरात "श्री विश्वकर्मा" आणि "श्री गणेश" यांच्या पंचधातू मुर्तींची स्थापना झाली आणि खर्या अर्थानं पुर्ण पंचक्रोशीत "श्री विश्वकर्मा आणि गणेश मंदीर" नावारूपाला आलं. आजतागायत "श्री विश्वकर्मा सुतार समाज" माघ शुक्ल चतुर्थीस येणारी "माघी गणेश जयंती" आणि माघ शुक्ल त्रयोदशीस येणारी "श्री विश्वकर्मा जयंती" मोठ्या उत्साहात आणि भक्ती-भावपुर्ण साजरा करीत आला आहे. तसं पाहायला गेलं तर अवघ्या २० ते २५ सभासदांचा "श्री विश्वकर्मा सुतार समाज". पण त्याचं कार्य एखाद्या मोठ्या समाजाला लाजवेल असं. मंदीराच्या समोर भव्य पटांगण आहे आणि श्री साईबाबांचं छोटेखानी मंदीरही आहे. मंदीरालगत असणार्या रंगमंचावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके सादर केली जातात. तेव्हा पटांगण प्रेक्षकांनी फुलून गेलेला असतो.
"श्री विश्वकर्मा सुतार समाज वडवली पदाधिकारी"
अध्यक्ष : श्री. धोंडू लहू गुहागरकर
उपाध्यक्ष : श्री. दिपक विठू तांबुटकर
सल्लागार : श्री. भगवान शंकर भेलसेकर
सेक्रेटरी : श्री. दिलीप किसन गुहागरकर
कोषाध्यक्ष : श्री. अनिल लक्ष्मण निवळकर
No comments:
Post a Comment