II आरती श्री विश्वकर्मा ( मराठी ) II
ओम प्रभु विश्वकर्मा I जय जय विश्वकर्मा II
आरती ओवाळितो आम्ही I सर्व मानवधर्मा II
ओम कारामधूनि जन्म तुमचा हो भगवान II
सगुणरूपही प्रथम तुमचे पंचमुखी भगवान II
ओम काराचे पाचही प्रणव पंचभुते म्हणती II
ब्रम्हा, विष्णु, सदाशिव, इंद्र, सुर्य नमो म्हणती II
मनु, मय, त्वष्ठा, शिल्पी, दैवज्ञ मुखोद्भव असती II
सृष्टीनिर्मीतीसाठी दशहात तुम्हासी असती II
पाच हात ज्ञानेंद्रिये पाच हात ते कर्मेंद्रिये म्हणती II
विश्वनिर्माता म्हणुनि विश्वकर्मा प्रजापती म्हणती II
मानवधर्म तुमचीच प्रथम पुजा ही करती II
भक्तांची संकट निवारूनी कर्मसिद्धी करिती II
पंचाल ब्राम्हण पंचशील कर्मात श्रेष्ठ हो म्हणती II
म्हणुनि त्यांना विश्वजाणते ब्राम्हण हो म्हणती II
तपोबलाते ऋषीकुलांत ही ब्रम्हपण बनती II
म्हणे नरोत्तम सगुणरूप पंचमुखी मनी बसती II
II श्री विश्वकर्मेय नम: II
No comments:
Post a Comment